कलंबिस्त घणशळवाडी मुख्य रस्ता ते कदमवाडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न..

0
165

शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या आमदार निधीतून रस्ता झाला होता मंजूर

सावंतवाडी,दि.२६:तालुक्यातील कलंबिस्त गावाच्या विकासासाठी स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून या भागात रस्ते पूल आदी विविध कामांसाठी भरघोस निधी देण्यात आला आहे. यापुढेही या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार निधी सह शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामे केली जातील असे बाळासाहेबांची शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांनी स्पष्ट केले .कलंबीस्त घणशळवाडी मुख्य रस्ता ते कदमवाडी या भागाकडे जाणार्‍या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले .यावेळी श्री राणे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना २०२१- २२ अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण विद्यमान शालेय शिक्षण मंत्री दिपक केसकर आमदार निधीतून मंजूर झाले आहे . या रस्त्याचे भूमिपून बाळासाहेबांची शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण राणे व माजी शिक्षण विस्तार अधिकारी विश्राम कलंबिस्तकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री गजानन नाटेकर , दत्ता सावंत, संजय पालकर, संदेश बिडये ,नूतन ग्रामपंचायत सदस्य दर्शना बिडये, हनुमान पास्ते, हर्षदा कदम, दत्ताराम कदम, वसंत कदम, अशोक रावूल, बाबा पास्ते , शाहू पास्ते , सुरेश पास्ते ,दाजी बिडये , बाळा बीडये ,अजित बिडये,पांडुरंग सावंत ,उदय सावंत, प्राजक्ता कदम ,सुगंधा कदम ,नूतन कलंबिस्तकर, विखाशा कदम, श्रद्धा कदम, अमित कदम , समीर कदम , सदा कदम ,सुमन कदम ,शाम कलंबिस्तकर,अजित कदम , इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे अशी ग्रामस्थ अपेक्षा व्यक्त केली .ओझरवाडी कदमवाडी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना बाळा साहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, बाजूला गजानन नाटेकर ,संजय पालकर, दत्ता सावंत, शाहू पास्ते, हर्षदा कदम ,दर्शना बिडये, हनुमंत पास्ते, आधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here