सिंधुदुर्ग,दि.०७: सरकारी कर्मचाऱ्याला शिवीगाळ करुन त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ओरोस येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांनी आरोपी समिर तुकाराम म्हाडेश्वर रा. डोंगरवाडी,माणगाव याची निर्दोष मुक्तता केलेली आहे. या कामी ॲड. अनिल निरवडेकर यांनी काम पाहिले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादीने दिलेल्या तक्रारी नुसार आरोपी याच्या घरा समोरून सागाच्या झाडाची तोड करुन ती कापून घेवून गेल्याचा माग लागल्याने वनरक्षक यांनी त्यानुसार चौकशी करण्यासाठी आरोपीयाच्या घरी व आजुबाजूला चौकशी केल्याच्या रागातून आरोपी याने फिर्यादी यांना जाब विचारला व शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानुसार फिर्यादी याने कुडाळ पोलिसठाणे येथे दिलेल्या तक्रारत्यानुसार कुडाळ पोलिस ठाणे येथे आरोपी याच्या विरुद्ध भा.द.वि. कलम ३५३,५०४,५०६प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता. याप्रकरणी ओरोस येथील अतिरिक्त जिल्हा न्यायधीश साहेब यांच्या समोर खटला चालविण्यात आला. याकामी सरकार पक्षाच्यावतीने एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. तपासादरम्यान साक्षीदारांच्या जबाबात असलेला दोष,साक्षीदारांचा उलट तपास,पोलीस तपासादरम्यान असलेला दोष, अशा प्रकारचे दोष सरकारपक्ष पुराव्यांसहित साबीत न करू शकल्याने,त्याचा फायदा देवून सबळ पुराव्याअभावी तसेच ॲड. निरवडेकर यांचा अंतिम युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी याची ओरोस येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशसाहेब श्रीम. व्ही. एस.देशमुख यांनी निर्दोष मुक्तता केली.याकामी आरोपी तर्फे ॲड. अनिल निरवडेकर व ॲड. गणेश चव्हाण यांनी काम पाहिले.