राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा आरोप
सावंतवाडी दि.२६: शहरातील सालईवाडा भागात सुरु असलेल्या गटार योजनेचे काम हे बोगस पद्धतीने सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आज येथे केला. दरम्यान सालईवाडा भागात सुरू असल्या गटाराचे काम संदर्भात कोणत्याही अधिकाऱ्याच किंवा ठेकेदाराचे लक्ष नसून बोगस वाळू देखील वापरली जात आहे. यामुळे जनतेचा निधी वाया घालण्याचे काम नगरपालिका प्रशासन करत असल्याचा आरोप देखील दळवी यांनी केला.
याबाबत अधिक माहिती अशी की सालईवाडा भागात गटाराचं सुरू असलेल्या काम हे बोगस पद्धतीने सुरू असल्याचं नागरिकांना निर्दशनात आले असता त्यांनी तात्काळ राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिकड यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. यावेळी दळवी हे त्वरित आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत पाहणी केली असता त्यांच्याही ही बाब निर्देशनास आली. त्यानंतर त्यांनी संबंधित ठेकेदाराला व नगरपालिका अधिकाऱ्यांना बोलवून हे काम थांबवण्यात आले आहे. जोपर्यंत चांगल्या प्रकारे वाळूचा वापर केला जात नाही तोपर्यंत हे काम सुरू करण्यात येता कामा नये असा पवित्रा श्री दळवी यांनी घेतला. तसा इशारा यावेळी संबंधित पालिका प्रशासन अधिकारी व ठेकेदाराला दिला. जोपर्यंत चांगल्या दर्जाच काम होत नाही तोपर्यंत हे काम करू देणार नाही, तर तोवर कॉन्ट्रॅक्टरच बील अदा करण्यात येवू नये अशी मागणी पुंडलिक दळवी यांनी केली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, उद्योग व्यापार कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, बाबल्या दुभाषी, बावतीस फर्नांडिस, आशिष कदम, इफ्तेकार राजगुरू, अशोक पवार, आगस्तीन फर्नांडिस आदी उपस्थित होते.