न्हावेली गावातील जुने जीर्ण विद्युत पोल बदलुन विद्युत वाहीनी सुरळीत
सावंतवाडी,दि.२७: तालुक्यातील न्हावेली गावातील विद्युत पोल बरीच वर्षे न बदलल्याने जिर्ण झाले होते.
याबाबत न्हावेली गावातील ग्रामस्थांनी ही बाब मनसे ग्रामपंचायत सदस्य आणि विभाग अध्यक्ष अक्षय पार्सेकर यांच्या निदर्शनात आणून दिली होती.
पार्सेकर यांनी लगेच स्थानिक ग्रामस्थांना घेऊन सावंतवाडी विद्युत महावितरण शाखेत भेट देऊन निवेदन दिले होते.
परिणामी महावितरण कंपनीने त्याची दखल घेत जीर्ण झालेले पोल बदलून त्या ठिकाणी नवीन पोल घालण्यात आले.
याबाबत येथील ग्रामस्थांनी मनसे पदाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य यांचे आभार मानले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा मनसे विभाग अध्यक्ष अक्षय पार्सेकर, न्हावेली ग्राम. पंचायत सदस्य आरती माळकर, चेतन पार्सेकर, प्रथमेश नाईक, राज धवण, नवनाथ पार्सेकर, किशोर पार्सेकर, अमोल पार्सेकर, दीपक बरकुटे, भावेश पार्सेकर, प्रसाद आरोंदेकर, दिपक पार्सेकर,
तुकाराम पार्सेकर, मयंग पार्सेकर, धनेश नाईक, दत्तप्रसाद पार्सेकर, अजय पार्सेकर, भूषण पार्सेकर, वासुदेव पार्सेकर, सुदन पार्सेकर, उदय परब, रूपेश पार्सेकर, राकेश न्हावेलकर, सावळाराम न्हावेलकर, सौरभ पार्सेकर, कुणाल पार्सेकर, आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.



