राष्ट्रीय छावा संघटनेच्या ३ ऱ्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडीत विविध कार्यक्रम

0
46

सावंतवाडी,दि.२८: राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र सिंधुदुर्ग च्या तिसऱ्या (३) वर्धापन दिनानिमित्त आज २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेतीन ३.३० वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन सावंतवाडी येथील जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांच्या कार्यालयात करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपकभाई केसरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असणार आहेत. तसेच माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सामाजिक कार्यकर्ते नारायण सावंत, शिवप्रेमी डॉ. प्रवीण कुमार ठाकरे, माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, आदी मान्यवर उपस्थित राहणार असुन यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष तळवणेकर यांनी दिली आहे.

दरम्यान राष्ट्रीय सेवा संघटना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.
तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन तळवणेकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here