आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर यांच्या प्रमुख उपस्तितीत आंबोली युनियन इंग्लिश स्कूल चा वार्षिक स्नेह समारंभ उत्साहात संपन्न

0
60

सावंतवाडी,दि.१४: तालुक्यातील आंबोली युनियन इंग्लिश स्कूल मध्ये सालाबाद प्रमाणे माघी गणेश जयंती उत्सव व वार्षिक स्नेह समारंभ उत्साहात संपन्न झाला.
या समारंभसाठी आंबोली युनियन इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक श्री मोरे, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी ,संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गावडे व संस्थेचे सचिव विष्णू चव्हाण,संस्था पदाधिकारी, आंबोली मुख्य गावकर शशिकांत गावडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व कार्यकारिणी,आजी माजी विद्यार्थी, आंबोली पोलीस पाटील सौ. विद्या चव्हाण,पत्रकार बंधू,ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

दरम्यान मुलांची रांगोळी स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षीस वितरनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

यावेळी आंबोली चे सरपंच सौ. सावित्री पालेकर,जगविख्यात शिक्षक श्री.सावंत, आंबोली तील सध्या कोल्हापूर येथे स्थित असलेले शिक्षक श्री पाताडे ,मुख्याध्यापक श्री मोरे व इतर व मान्यवरांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले.व संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here