सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांची माहिती
सावंतवाडी,दि.१३: राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत उदयनराजे महाराज यांचा वाढदिवस २४ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे.
यानिमित्त संस्थेचे सल्लागार नारायण सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष संतोष तळवणेकर,भाजपा कामगार मोर्चा सावंतवाडी विधानसभा संयोजक सत्यम सावंत, कल्याण कदम,सौ. पूजा गावडे,सौ. स्वप्ना नाईक, सौ. आशा इंगळे, सौ. संगीता पारधी, सौ. सेजल पेडणेकर, सौ. शेता गावडे, सौ. मनीषा गावडे, सौ. संचिता गावडे, ज्ञानेश्वर पारधी,संजय गावडे, सचिन गावडे,अक्षता कुडतकर, सरिता भिसे, तसेच सर्व सदस्य मिळून येथील नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये विश्वकर्मा योजना, कामगार कल्याण योजना, घरेलू कामगार योजना आशा विविध योजना राबविणार आहेत.
याची सुरुवात केली असून आतापर्यंत एकूण ५० कारागिरांना लाभ देण्यात आला.