🎴सावंतवाडी,३१ : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सावंतवाडी तालुका वतीने उपवनसंरक्षक रेड्डी यांची भेट घेतली या भेटी अंतर्गत सावंतवाडी तालुक्यातील वनविभागातील विविध विषयावर चर्चा करण्यात आली तसेच मनसेचे पदाधिकारी प्रवीण गवस यांनी काही दिवसापूर्वी दोडामार्ग तालुक्यातील हत्तींचा विषय संदर्भात नुकसान भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता यासंदर्भात सदर निधी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ३२ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाशी बोलून येत्या पंधरा दिवसात सदर निधी नुकसान भरपाईग्रस्तांना देण्यात येईल तसेच वनविभागाच्या माध्यमातून हत्ती प्रतिबंधक सोलर कंपाउंड उभारण्यात येईल असे आश्वासन त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले तसेच आपण आपल्या काही कर्मचाऱ्यांना कर्नाटक भुज येथून प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी व गावकरी यांना ज्या ठिकाणी हत्तींचा वावर जास्त आहे त्या गावांमध्ये प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम ही आपल्या माध्यमातून करू तसेच हत्ती प्रतिबंधक असे आश्वासन त्यांनी यावेळी दिलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे की या सावंतवाडी तालुक्यात गवे रेडे हे भात शेतीचा मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे त्या संदर्भातही चर्चा करण्यात आली आपण सुचवलेल्या कार्याची मी नक्कीच दखल घेईन असे आश्वासन श्री रेड्डी यांनी दिले यावेळी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, कॉलेज युनिट अध्यक्ष साहिल तळकटकर प्रवीण गवस, महेंद्र कांबळी आदि उपस्थित होते.