T20 World Cup: रोहित-विराटसाठी हा शेवटचा टी20 वर्ल्ड कप? पाहा BCCI सिलेक्टर काय म्हणाले…

0
140

मुंबई, 1 नोव्हेंबर: रोहित शर्मा आणि विराट कोहली… सध्याच्या भारतीय संघातील ही दोन मोठी नावं. रोहितच्या नेतृत्वात सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्ड कप मोहिमेवर आहे. याच दरम्यान सोमवारी बीसीसीआयच्या निवड समितीनं न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी टीमची घोषणा केली. पण त्यात न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित आणि विराटला विश्रांती देण्यात आली आहे. त्यावरुन बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मांनी एक विधान केलं आहे. त्यावरुन अनेकांचं म्हणणं आहे की रोहित आणि विराट कदाचित आपला शेवटचा टी20 वर्ल्ड कप खेळत आहेत.

न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया 3 टी20 आणि 3 वन डे सामने खेळणार आहे. हा दौरा टी20 वर्ल्ड कप संपल्यानंतर लगेचच 18 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या दौऱ्यात टी20 संघाची कमान हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली आहे. तर वन डे मालिकेत शिखर धवन नेतृत्व करणार आहे. टीमची घोषणा झाल्यानंतर निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांना रोहित आणि विराटच्या विश्रांतीविषयी आणि पुढच्या वाटचालीविषी विचारण्यात आलं. तेव्हा वर्कलोड मॅनेंजमेंटमुळे त्यांना विश्रांती देण्यात आल्याचं चेतन शर्मा यांनी सांगितलं. तर पुढच्या वाटचालीविषयी ते म्हणाले की, ‘एखादी टूर्नामेंट सुरु असताना याविषयी कसं बोलू शकतो… ते मोठे खेळाडू आहेत. त्यांना जर कधी काही वाटलं तर ते आमच्याशी थेट बोलतील.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here