खा.प.प्राथमिक शिक्षक महासंघाचे पुरस्कार जाहीर

0
144

भडगाव सांद्रेवाडी आदर्श शाळा तर शांताराम जंगले व सचला आरोलकर आदर्श शिक्षक पुरस्कार

सावंतवाडी-दि.१८ महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांच्या 2022 च्या वार्षिक स्नेह मेळाव्याच्या नियोजनाची सभा नुकतीच पतपेढी सिंधुदुर्ग नगरी येथे संपन्न झाली. ही शैक्षणिक संघटना प्राथमिक शिक्षकांच्या न्याय व हक्कासाठी काम करणारी संघटना असून शिक्षकाच्या विविध प्रश्नांसोबत खाजगी पसंत शाळातील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमी कार्यरत असते, ही संघटना दरवर्षी विद्यार्थी व शिक्षकांसाठी विविध पुरस्कार जाहीर करते.संघटनेच्या या बैठकीमध्ये दरवर्षी देण्यात येणारे विविध पुरस्कार यावेळी जाहीर करण्यात आले. यामध्ये मानाचा समजला जाणारा (कै.रामचंद्र भगवान चौकेकर यांचे स्मरणार्थ श्री. गणपत रामचंद्र चौकेकर पुरस्कृत) *आदर्श शाळा पुरस्कार यावर्षी खा.प. शाळा भडगाव-सांद्रेवाडी, तालुका-कुडाळ* या शाळेला जाहीर झाला. त्याचप्रमाणे (श्रीमती सरोज शिवाजी परब.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य )यांच्यातर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार *श्री शांताराम धाकू जंगले (खाजगी पसंत शाळा असलदे-तावडेवाडी कणकवली)* यांना तर (कै.योगेश विनायक कसालकर यांचे स्मरणार्थ श्रीमती विनया विनायक कसालकर पुरस्कृत) सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार यावर्षी *श्रीमती सचला शंकर आरोलकर, खाजगी पसंत शाळा रायाचे पेड- सातार्डा,सावंतवाडी* यांना जाहीर झाला. याशिवाय मंत्री कुटुंबीयांकडून चार विद्यार्थ्यांना तसेच सिस्टर बालविना कर्वालो (माजी मुख्या.मिलाग्रीस प्राथमिक शाळा, सावंतवाडी) यांच्याकडून एका विद्यार्थ्यांला देण्यात येणारा हुशार व होतकरू विद्यार्थी पुरस्कार यावेळी जाहीर करण्यात आला. यामध्ये 1) तन्वी दिनकर कासवकर-( इयत्ता चौथी) सेंड पीटर्स देवबाग,2) नागेंद्र युवराज तारी (दुसरी) भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण. 3)हर्षिता शिवा मोर्जे- टोपीवाला प्राथमिक शाळा. 4) शुभदा न्हानू आंगचेकर (तिसरी) आंबेगाव शाळा. 5)केरल कारू लोबो (दुसरी) तेरवन मेढे,दोडामार्ग यांना हे पुरस्कार देण्यात आले. याशिवाय मुलांसाठी रंगभरण- (पहिली व दुसरी), हस्ताक्षर-(3 री व 4 थी तसेच 5 वी ते 7 वी) स्पर्धा आयोजित केली. तसेच शिक्षकांसाठी ऑनलाईन कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याशिवाय प्राथमिक शिक्षकांच्या मुलानी/पाल्यांनी उज्ज्वल यश संपादन केले असल्यास त्यांचा गुणगौरव स्नेहसंमेलन मेळाव्यामध्ये करण्यात येईल असे सांगण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ जिल्हा शाखा सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष श्री.अरुण कुंभार, कार्याध्यक्ष दर्शना गुळवे,सचिव श्री.डी.जी.वरक, सदस्य प्रदीप सावंत,शांताराम जंगले,रेनॉल्ड भुतेलो,सचला आरोलकर, सुप्रिया हणजनकर, तुषार गोसावी,सरिता गोलतकर, सीमंतिनी सावंत,उल्का खोत, रतन डोईफोडे,सॅन्ड्रा लोबो आदी शिक्षक उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here