मोती तलावाच्या “त्या” संरक्षक भिंतीच्या कामाला होणार २६ डिसेंबर रोजी सुरुवात..

0
128

बांधकाम विभागाने घेतली दखल..माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची माहिती..

सावंतवाडी, दि.१६ : येथील मोती तलावा मधील गाळ काढताना तलावाची संरक्षक भिंत कमकुवत झाली होती आणि ती पावसाळ्यात कोसळली, त्यामुळे येथून ये जा करणाऱ्या पादचाऱ्यांना याचा नाहक त्रास सतावत होता. लोकप्रतिनिधी,पत्रकार यांनी वारंवार याकडे लक्ष देऊन संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारण्यात आला होता मात्र याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने गेले कित्येक महिने सावंतवाडी येथील मोती तलावाच्या त्या संरक्षक भिंतीचा प्रश्न रेंगाळत पडला होता,

याबाबत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आक्रमक पवित्रा घेत १७ डिसेंबर पासून सह्यांची मोहीम राबवून आंदोलन करण्याचे घोषित केले होते, परंतु आज बांधकाम अधिकारी चव्हाण यांनी आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच २२ डिसेंबरला वर्क ऑर्डर देण्यार आहे तसेच ठेकेदाराने तात्काळ काम सुरू करण्याचे मान्य केल्याचे फोनवरून सांगितले आहे.

दरम्यान माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, रवी जाधव, नगरसेविका अफरोज राजगुरू, राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष बंटी माटेकर, उपाध्यक्ष बंड्या तोडफेकर, दिलीप पवार, संतोष तळवणेकर, कल्याण कदम सर यांच्याशी चर्चा करून तूर्तास उद्या होणारे आंदोलन मागे घेण्यात आले आहे ,अशी माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या प्रसिद्ध पत्रकातून दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here