माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर शिष्टमंडळाचे पोलीस निरीक्षक अधिकारी यांना निवेदन
सावंतवाडी,दि.१३: बोर्डी पुल ते आंबोली घाट दरम्यान असलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक ठरत असून या रस्त्यावर गेल्या काही महिन्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
हा रस्ता काही महिन्यापूर्वीच केलेला असून यासाठी शासनाचे कोट्यावधी रुपये खर्च केले मात्र सहाय्यक,कार्यकारी अभियंता आणि ठेकेदार यांच्या संगनमताने या रस्त्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप करत आज माजी नगराध्यक्ष आणि त्यांच्या शिष्टमंडळाने सावंतवाडी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची भेट घेत शाखा अभियंता आणि ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्य वदाचा गुन्हा दाखल करा व त्यांच्या बेनाम संपत्तीची चौकशी करा अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग, मराठा समाज सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे, विलास जाधव, सुरेश भोकटे, रवी जाधव,उमेश कोरगावकर, सुधीर पराडकर,सुंदर गावडे, मनोज घाटकर,अभय पंडित,तुकाराम कासार, राजेंद्र सांगेलकर,महादेव राऊळ, वैभव माठेकर,उमेश खटावकर आदी उपस्थित होते.