खासदारांच्या हस्ते होणार संचालकांचा सत्कार.. तालुकाप्रमुख रुपेश राऊळ
सावंतवाडी,दि.१२ : येथील तालुका विविध औद्योगिक सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उत्कर्ष पॅनलने गजानन सावंत यांच्या नेतृत्वाखाली सर्वच्या सर्व अकरा जागा जिंकत दणदणीत विजय संपादन केला.
याबद्दल आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी सर्व संचालकांना शिवसेना शाखेत बोलवत त्यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दरम्यान निवडून आलेल्या सर्व संचालकांचा खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत भव्य सत्कार करण्यात येणार असल्याचे श्री राऊळ म्हणाले.
यावेळी बाळू माळकर, पुरुषोत्तम राऊळ, अशोक परब,चंद्रकांत कासार, माजी सभापती रमेश गावकर,आबा सावंत, विनोद ठाकूर,उल्हास परब आदी उपस्थित होते.