सावंतवाडी,दि.१४ : भारतीय नौसेना दिन ४ डिसेंबर २०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्हयात मोठया उत्साहात संपन्न झाला, याप्रसंगी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, राज्यपाल, मंत्री मंडळातील मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या उभारलेल्या पुतळयाचे अनावरण करण्यात आले.
दरम्यान मालवण येथे देशाचे पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करण्याचे भाग्य मला लाभले व
या प्रशस्त कार्यक्रमाला उपस्थित राहून नौदलाच्या अभूतपुर्व प्रात्यक्षिकांचे अनुभव घेण्याची सुवर्ण संधी मला मिळाली अशा शब्दात जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नारायण राणे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,मंत्री दिपकभाई केसरकर, मंत्री उदय सामंत, मंत्री संजय बनसोडे, मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार रविंद्र फाटक, तसेच इतर मान्यवर मंत्री, नौसेना अधिकारी आणि कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.