सिंधुदुर्ग,दि.२७: महाराष्ट्र राज्यातील व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावच्या व दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली गावच्या श्री देवी सोनुर्ली माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव उदया दिनांक २८ नोव्हेबेर रोजी संपन्न होत आहे.
दक्षिण कोकणचे आराध्य दैवत म्हणून श्री देवी सोनुर्ली माऊलीची ओळख आहे. या देवीचा वार्षिक जत्रोत्सव म्हटले की सिंधुदुर्ग जिल्हा भक्तगणांबरोबरच गोवा, कर्नाटक, बेळगाव, मुंबई, कोल्हापूर तसेच अन्य राज्यातून लाखो भाविक या देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाला दर्शनासाठी येतात. माऊली देवीचे भव्यदिव्य मंदिर भक्तगणांच्या सहकार्यातूून उभारण्यात आले आहे.यावर्षी तर पूर्ण मंदिर परिसर पण मंडप उभारून वाढवीण्यात आला आहे. त्यामुळे भक्तगण याना सुलभ दर्शन माऊली देवीचे घेता येणार आहे .
सोनुर्ली माऊली देवस्थान कमिटी, मानकरी वर्ग तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणा यांच्या सहकार्यातून या जत्रोत्सवाचे नियोजन योग्य प्रकारे केले जाते ,तसेच यावर्षी येणाऱ्या भक्तगणांना चांगली सुविधा देण्याच्या दृष्टीने देवस्थान कमिटी वेगवेगळे उपाय योजना राबवित आहेत. माऊली जत्रोत्सव २८ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार असून या जत्रोत्सव निमित्त नियोजन सध्या जोरात सुरू आहे.
नवसाला पावणारी व हाकेला धावणारी सोनुर्ली गावची माऊली अशी या देवीचे ख्याती सर्वतोपरी पसरली आहे.