सातार्डा जत्रोत्सव व कौलोत्सव भक्तीभावात उत्साहात साजरा

0
159

सावंतवाडी,दि.२७: तालुक्यातील तेरेखोल खाडी काठी वसलेल्या व भात शेती अन्नधान्याने संपूर्ण सातार्डा गावचा श्री देव महादेव रवळनाथ जत्रोसव त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या थाटात साजरा झाला.तर आज दुसऱ्या दिवशी सोमवारी कौलोत्सवाचाही कार्यक्रम मोठ्या भक्ती भावाने पार पडला
श्री रवळनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी रांग केली होती त्याचबरोबर श्री महादेव मंदिरासमोर दर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या तरंगकाठीचेही दर्शन आणि श्री माऊलीला खणा नारळाची ओटी अर्पण करण्यासाठी माहेरवाशींनी मोठी गर्दी केली होती.

मंदिर परिसर विद्युत रोषणाईने सजवण्यात आला होता तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने महादेव मंदिरासमोर दीपोत्सव पार पडला
पहाटे पाच वाजल्यापासून दर्शनाची रांग सुरू झाली यासाठी देवस्थान उपसमितीने बॅरिकेट्स लावले होते त्यामुळे दर्शन सुलभ झाले रात्री अकरा वाजता च्या सुमारास पालखी सोहळा झाला त्यानंतर दशावतार नाट्य प्रयोग करण्यात आला दुसऱ्या दिवशी सायंकाळी चार वाजता अवसारी कौल उत्सव साजरा झाला यावेळी ही भक्तगणांनी मोठी गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here