शिक्षण प्रसारक मंडळ, ओटवणे (हायस्कुल ) सभागृहासाठी खासदार निधीतून १२ लाख निधी..

0
211

उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते भूमिपूजन

सावंतवाडी,दि.२६: रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार विनायक राऊत यांच्या खासदार निधीतून मंजूर झालेल्या शिक्षण प्रसारक मंडळ, ओटवणे (हायस्कुल )येथे सभागृह बांधणे (१२ लाख रुपये )या कामाचे भूमिपूजन तालुका प्रमुख रुपेश राऊळ, सौ.ऋतुजा राऊळ यांच्या शुभहस्ते झाले.

यावेळी ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, उपसरपंच संतोष कासकर, उबाठा चे उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे,उप तालुका प्रमुख आबा सावंत, पक्ष निरीक्षक अशोक परब ,विभाग प्रमुख सुनील गावडे,शिक्षण प्रसारक मंडळ ओटवणे चे अध्यक्ष वामन कविटकर, उपाध्यक्ष बाबाजी गावकर, सचिव राजाराम वर्णेकर, संतोष कविटकर, मुख्याध्यापक राजेंद्र देसाई, रवींद्र गावकर, उमेश गावकर, रवींद्र म्हापसेकर, दत्ताराम गावकर,

मनोहर मयेकर, अस्मिता भगत, मनाली गावकर,समीक्षा गावकर,प्रकाश पनासे, संजय कविटकर, गुंडू जाधव, मंगेश चिले,कृष्णा देवळी,पुरोहित बंडया केळकर,सुनील मेस्त्री, आदी शिक्षक वृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here