कलंबिस्त येथे सरपंच सौ. सपना सावंत यांच्या हस्ते बीएसएनएल टॉवरचे भूमिपूजन..

0
84

सावंतवाडी, दि.१८: गेली कित्येक वर्ष कलंबिस्त गावात बीएसएनएल चा मोबाईल टॉवर व्हावा अशी इच्छा होती, अखेर हा टॉवर मंजूर झाला असून या टॉवरच्या कामाचे भूमिपूजन गावचे सरपंच सौ.सपना सावंत यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून कलंबिस्त राईवाडा येथे करण्यात आले.

यावेळी सरपंच सौ सावंत म्हणाल्या कलंबिस्त गावाच्या विकासाच्या दृष्टीने हा टॉवर निश्चितच वरदान ठरणार आहे. आम्ही गावाच्या विकासाच्या दृष्टीने सर्वांना एकत्र घेऊन काम करत आहोत आणि यापुढेही करत राहू खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून आणि प्रयत्नाने हा टॉवर मंजूर झाला आहे एक प्रकारे गाव वासियांचे स्वप्न आज सत्यात उतरले आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सैनिकी परंपरा असलेला कलंबिस्त गाव या गावात बीएसएनएल चा मोबाईल टॉवर व्हावा यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून प्रयत्न होत होते पण अखेर खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून कलंबिस्त गावात बीएसएनएल टॉवर मंजूर झाला यासाठी लागणारी जागा राईवाडा येथील अंगणवाडी व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र जवळील जिल्हा परिषद च्या मालकीची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जागेत हा टॉवर उभारण्याच्या कामाला आज आज शनिवार १८ नोव्हेंबर पासून सुरुवात करण्यात आली आहे टॉवर कामाचे भूमिपूजन सरपंच सौ सपना सावंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच सुरेश पास्ते हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक गुंडू सावंत, जेष्ठ देवकार रमेश सावंत, माजी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत, शिवसेनेचे शाखाप्रमुख दिनेश सावंत, श्याम राऊळ, माजी सरपंच अनंत सावंत, मधुकर राऊळ, बाळा राजगे, बाबू सावंत, ज्येष्ठ ग्रामस्थ सगुण पास्ते, रामचंद्र पास्ते, तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष बाबा पास्ते, माजी सैनिक प्रकाश सावंत, बाळा सावंत, ग्रामपंचायत सदस्य दीपक जाधव, शेखर मेस्त्री, शशिकांत सावंत, दत्ताराम कदम, जितेंद्र पांगम, राजेश सावंत, मेघा तावडे, सौ.सुप्रिया राऊळ, रामा सावंत दाजी सावंत, चंदू पास्ते, उदय सावंत, वसंत सावंत, सौ.सावंत अंगणवाडी सेविका सौ बिडये आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी गुंडू सावंत यांनी आपले विचार मांडले सूत्रसंचालन व आभार ॲड संतोष सावंत यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here