मनोहर मनसंतोष गडावर माहिती फलकाचे अनावरण..

0
124

दुर्ग मावळा प्रतिष्ठानचा पुढाकार..

सिंधुदुर्ग,दि.२०: मनोहर मनसंतोष गडावर येणाऱ्या अभ्यासक व पर्यटकांच्या माहितीसाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठानमार्फत मनोहर मनसंतोष गडावर माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले. त्यामुळे दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या या उपक्रमाबाबत मनोहर मनसंतोष गडावर येणाऱ्या अभ्यासकांसह पर्यटकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

मनोहर मनसंतोष गडावर शिवापूर व शिरशिंगे मार्गे येणाऱ्या वाटा ज्या ठिकाणी एकत्र येतात, त्या बाजार आंबा या ठिकाणी मनोहर मनसंतोष गडाच्या माहितीचे फलक जीर्ण झालेले होते. त्यामुळे या ठिकाणी नवीन माहितीदर्शक फलकाची आवश्यकता होती. ही गरज दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या लक्षात येताच दुर्ग मावळा प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन या गडावर माहितीदर्शक फलक लावला. या माहितीदर्शक फलकात मनोहर मनसंतोष गडाची प्राथमिक माहिती, दुर्ग भ्रमंती करणाऱ्यांसाठी सूचना, गडाचा नकाशा आदी माहितीचा समावेश आहे.

या मार्गदर्शक व माहिती फलक मोहिमेत गणेश नाईक, रोहन राऊळ, प्रणय राऊळ, प्रकाश कडव, मेघ:श्याम सावंत, यश कडव, ओंकार शेडगे, विनायक बांग, विशाल परब आदींनी सहभाग घेतला. या मार्गदर्शक व माहिती फलकासाठी मेघःश्याम सावंत यांनी विश्वनाथ सावंत यांच्या स्मरणार्थ सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here