ग्रामस्थांचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन
सावंतवाडी,दि.०३: मराठा बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी जालना येथील मराठा समाज समन्वयक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर उपोषणे आंदोलने होत आहेत.
याचाच एक भाग म्हणून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा येथील मराठा बांधवांनी येत्या ८ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारले आहे.
हे उपोषण अत्यंत शांततेने व पोलीस प्रशासनाला कोणत्याही प्रकारचा ताण न देता करणार असल्याचे मराठा बांधवांनी निवेदनात म्हटले आहे.
याबाबत आज तहसीलदार श्रीधर पाटील यांना आरोंदा येथील ग्रामस्थांनी निवेदन दिले.
यावेळी यावेळी मराठा समाज सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे, अभिमन्यू लोंढे,अध्यक्ष सखाराम जामदार,उपसरपंच सुभाष नाईक, ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर,शिल्पा नाईक सुभद्रा नाईक,शुभांगी नाईक ,विद्याधर नाईक, विष्णू नाईक,राजेश नाईक, शलाका नाईक, अंकिता मयेकर, संदेश परब, प्रशांत कोरगावकर, शांताराम परब, अनंत नाईक, कृष्णा आचरेकर ,आनंदी नाईक,दिलीप नाईक, हनुमान नाईक, राजू नाईक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत आरोंदा ते कस्टम ऑफिस ,आरोंदा पोस्ट ऑफिस आरोंदा या मर्यादित कक्षेत पद रॅली काढण्यात येणार आहे.