कोलगाव ग्रामस्थांनी पुकारलेल्या लाक्षणिक उपोषणाला सीताराम गावडे व लखम राजे भोसले यांनी दिली भेट
सावंतवाडी,दि.०२: मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी सर्वांनी संघटित राहून आपला एकोपा व लढा कायम सुरू ठेवायला हवा माझ्याकडून लागेल ती मदत मी आपल्याला द्यायला तयार आहे तुम्ही फक्त तुमची एक जूट ठेवा असे आवाहन संस्थानचे युवराज लखम राजे भोसले यांनी कोलगाव ग्रामस्थानी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पुकारलेला लक्षणीधी उपोषणाला दिलेल्या भेटी प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
कोलगाव ग्रामस्थांनी आज सकाळी कोलगाव ग्रामपंचायत पासून संपूर्ण गावाला फेरफटका मारणारी भव्य बाईक रॅली काढली त्यानंतर या बाईकडे चे रूपांतर उपोषणामध्ये झाले या उपोषणाला अनेक मान्यवरांनी भेट दिली. आज दुपारी साडेबारा वाजता संस्थानचे युवराज लखम राजे भोसले सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सिताराम गावडे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषण कर्त्यांना आपला पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी युवराज लखन राजे भोसले बोलत होते, संस्थान कडून मराठ्यांना लागणारी सर्व मदत आम्ही पूरवू तुम्ही तुमचा एकोपा कायम ठेवा, आरक्षण ही आता काळाची गरज बनली आहे ,त्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे ती एकजूट तुम्ही ठेवाल अशी आशा बाळगतो असे सांगून आरक्षण हक्काचे आहे व ते मिळायलाच हवे असे मत व्यक्त केले.
तर सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सिताराम गावडे यांनी आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी आरक्षण ही काळाची गरज आहे, त्यामुळे राजकीय कवच कुंडले बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन हा लढा उभारायला हवा असे आवाहन करत कोलगाव ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे बाईक रॅली,व उपोषण केले त्यांचे अभिनंदन करून पाठिंबा व्यक्त केला, यावेळी गावचे सरपंच संतोष राऊळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर अभिजीत टीळवे ,प्रशांत कोठावळे ,अपर्णा कोठावळे ,चंदन धुरी व ग्रामस्थांनी आपली मते व्यक्त केली.