कोल्हापूर येथील लाचलुचपत विभागाची कारवाई…
सावंतवाडी,दि.१२: सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी एक लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी कोल्हापूर येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. बिल्डर सिद्धांत परब यांनी याबाबत तक्रार केली होती. सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लाच घेताना पकडण्यात आल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. कोल्हापूर येथे लाच लुचपत विभागाचे पथक कसून चौकशी करत आहेत. खंडागळे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.