हातातील बँडची गरज नाही ; संजू परब यांची माहिती
सावंतवाडी,दि.१२ : भाजपा
युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरूवात सुध्दा झाली आहे. त्यांचा जन्मदिनी १५ तारीखला जुबिन नौटीयाल यांचा कार्यक्रम होणारं आहे. या कार्यक्रमात प्रवेश घेण्यासाठी हातातील बँड असावे अशी अट होती मात्र ती रद्द केली असून बँड असण्याची गरज नाही. सर्व नागरिक या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात अशी माहिती माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी त्यांच्या सोबत दादा साईल, तेजस माने,दिलीप भालेकर, बंटी पुरोहित आदी उपस्थीत होते.