उपजिल्हा रूग्णालयाला वॉटर प्युरिफायर भेट

0
149

अर्चना घारे परब यांच्या वाढदिवसाचे निमित्त;राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष राकेश नेवगी यांचे दातृत्च

सावंतवाडी ता.०१-: राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष सौ अर्चना घारे परब यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे तालुका उपाध्यक्ष राकेश नेवगी यांनी उपजिल्हा रुग्णालयाला वॉटर प्युरिफायर भेट दिला. यावेळी वैद्यकीय अधीक्षकांकडून त्यांचे आभार मानण्यात आले.

यावेळी जीवन रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवा टेंमकर, हिदायतुल्ला खान, बाबल्या दुभाषी, रोहन परब, इफतिकार राजगुरू, संतोष जोईल, बावतीस फर्नांडिस ,अफरोज राजगुरू, चित्रा देसाई, रिद्धी परब, सायली दुभाषी , रिटा फर्नांडिस, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here