सावंतवाडी दि.३० भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी तालुका मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते आज सावंतवाडी शहरातील रामेश्वर प्लाझा येथे करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली,जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, बाळू देसाई, जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा चिटणीस मनोज नाईक, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, माजी जि.प.सदस्य पंढरी राऊळ,महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगांवकर, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी,सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, जिल्हा बँक संचालक गजानन गावडे, खरेदी विक्री संघ संचालक प्रमोद गावडे, प्रमोद सावंत, माजी जि.प. अध्यक्षा रेश्मा सावंत, माजी जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, तालुका उपाध्यक्ष शेखर गांवकर, माजी जि.प. सभापती शर्वाणी गावकर, माजी जि.प. सदस्या श्वेता कोरगांवकर, माजी सभापती पंकज पेडणेकर, माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, राजू बेग, अॅड. परिमल नाईक, उदय नाईक, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, नेमळे सरपंच विनोद राऊळ, सुकन्या टोपले, वामन नार्वेकर, मळगांव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, दिलीप भालेकर, दादा परब, परिक्षात मांजरेकर,आंबोली उपसरपंच दत्तु नार्वेकर, खरेदी विक्री संचालक आत्माराम गावडे, विनायक राऊळ, आदींसह भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी व तालुका कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य, शहर मंडल कार्यकारीणी पदाधिकारी व सदस्य, सर्व सेलचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बुथ अध्यक्ष तसेच अन्य लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



