माजी खासदार डॉ. निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार कार्यक्रमाचे उद्घाटन
कुडाळ येथे इंदुरीकर महाराजांचे कीर्तन
कुडाळ,दि .०९: भाजपचे युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल अभिष्टचिंतन सोहळ्यास आज पासून सुरुवात होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते आज संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाने प्रारंभ होणार आहे.
कुडाळ येथील श्री वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे आज सोमवारी ०९ ऑक्टोबरला सायंकाळी सात वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.