बीएसएनलच्या अनियमित सेवेत सुधारणा केली जावी…

0
64

सावंतवाडी मनसे कडून जिल्हा प्रबंध रविकिरण जन्नू यांच्याकडे मागणी

सावंतवाडी,दि.०९: तालुक्यातील बीएसएनलच्या अनियमित सेवेत सुधारणा केली जावी, नेटवर्क (रेंजचीं) समस्या अद्यापही कायम असून याबाबत वारंवार लक्ष वेधून देखील कोणतीही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे बिएसएनएल कंपनीने आपल्या सेवेत सुधारणा करावी, तालुक्यात अद्याप फोरजी सुविधा सुरु झालेली नाही ती लवकर सुरु करावी अशी मागणी सावंतवाडी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बिएसएनएलचें जिल्हा प्रबंधक रविकिरण जन्नू यांच्याकडे करण्यात आली. यावर जन्नू यांनी तालुक्यातील मोबाईल सेवा सुरळीत रहावी यासाठी १३६ नवीन टॉवर मंजूर झाले आहेत. त्यांची उभारणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून लवकरच ग्राहकांना दर्जेदार सुविधा मिळेल नव्याने तालुक्यात उभारण्यात येणारे टॉवर चे काम येत्या दोन महिन्यात सुरू होणार असल्याचीं ग्वाही श्री जन्नू यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिले.
सोमवारी मनसे पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील बीएसएनएल च्यां कोलंमडलेल्या मोबाईल सेवेबाबत मनसे पदाधिकारी आशिष सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रबंधक जन्नू यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. बिएसएनएलची सुविधा बहुतांश गावामध्ये आहे मात्र रेंज चा प्रश्न आजही कायम आहे. फोरजी सेवा अद्याप ग्राहकांना मिळत नाही. टूजी चें रूपांतर फोरजी मध्ये झाल्याने त्यां ठिकाणी लवकर नवीन फोरजी टॉवर उभारण्यात येतील आणि नागरिकांना होणारा रेंज चा त्रास कमी होईल असे आश्वासन दिले.
तळवणे किनळे न्हावेली अशा भागांमध्ये येत्या दोन महिन्यात टॉवरची काम सुरू होणार अशी माहिती जिल्हा प्रबंधक रविकिरण जन्नू यांनी दिली
सावंतवाडी तालुक्यातील डिंगणे न्हावेली, तळवणे, आरोस पडवे माजगाव, ओटवणे,इन्सुली आदी भागांसह तालुक्यात बीएसएनएल च्यां सेवेचा बट्ट्याबोळ झाला आहे. त्यावर अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता येत्या दोन महिन्यात नव्याने फोर जी सेवा सुरू होणार असल्याने सेवेत बरीच सुधारणा दिसेल.
सगळीकडे बऱ्याच ठिकाणी खाजगीकरण झाले आहे त्यामुळे विविध कंपन्यांना टॉवर संदर्भात कंत्राट दिलेले आहे.त्यात तालुक्यात १३६ ठिकाणी मंजुरी मिळाली असल्याची बीएसएनएलचे अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाली. यावेळी बिएसएनएलचें श्री देशमुख उपस्थित होते.
यावेळी माजी शहराध्यक्ष तथा मनसे विद्यार्थीसेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, मंदार नाईक, प्रकाश साटेलकर,डिंगणे ग्रा.प सदस्य सदस्य आदेश सावंत, रस्ते आस्थापना उपजिल्हा संघटक अभय देसाई, विद्यार्थीसेना जिल्हा सचिव निलेश देसाई, नंदू परब, विद्यार्थीसेना तालुका अध्यक्ष संदेश सावंत,पिंट्या नाईक, विशाल बर्डे .आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here