वन विभागाकडून ठोस कार्यवाही नाही…शेतकरी हवालदिल
सावंतवाडी,दि.०२: तालुक्यात आंबोली येथे घुमाकूळ घालत असलेल्या हत्तींना हटावण्या साठी वन विभागा मार्फत ठोस कार्यवाही होत नाही आहे. असा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष पालेकर व सरपंचा सौ सावित्री पालेकर यांनी केला आहे.

त्याचप्रमाणे गवरेडे व रानटी डुक्कर व माकड याच्या पासून होणाऱ्या नुकसाना बाबत देखील कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही.
यासाठी वन विभागाला जाब विचारण्यासाठी उदया मंगळवार दिनांक 03-10-2023 रोजी सकाळी 10.00 वाजता आंबोली वन विभाग कार्यालयात सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी व ग्रामस्थ आंबोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.



