सावंतवाडी,दि.०२: प्रतिवर्षी प्रमाणे आज सावंतवाडी येथील डॉ परूळेकर नर्सिंग होम येथे जिल्ह्यातील गरजू रुग्णांना मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे आर्थिक मदत करण्यात आली.
बांदा येथील मेंदू कर्करोगग्रस्त प्रसाद बांदेकर,मानेच्या मणक्याची शस्त्रक्रिया झालेल्या आणि अपंगत्व आलेले बांदा येथील विनय सावंत, मुळदे येथील अर्धांगवायू झालेले संजय
गवई,कास येथील ह्रदय शस्त्रक्रिया झालेले प्रकाश मेस्त्री आणि असनीये येथील मधुमेह आणि रक्तदाब ग्रस्त अनिल सावंत अशा पाच लाभार्थी रुग्णांना डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.त्यावेळी असनीये येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत उपस्थित होते.