सावंतवाडीत विविध संघटनांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम..

0
109

चला परिसर स्वच्छ करूया, सुंदर भारत घडवूया.. डॉ.नवांगुळ

सावंतवाडी,दि.०२: केंद्र शासनाच्या स्वच्छता अभियानात रविवारी सावंतवाडी मेडिकल असोसिएशन, रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, रक्तदाता संघटना आणि उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग दर्शवला.
यावेळी उपजिल्हा रुग्णालय परिसर शिल्पग्राम परिसर, सावंतवाडीतील मोती तलाव परिसर आणि आयुर्वेद महाविद्यालय परिसरात स्वच्छता करण्यात आली.

सावंतवाडी नगरपालिका मुख्याधिकारी साळुंखे आणि उपविभागीय अधिकारी ( प्रांत ) प्रशांत पानवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

यावेळी सावंतवाडी मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉक्टर नवांगुळ, इनरव्हील क्लबच्या रिया रेडिज, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉक्टर ऐवाळे, रोटरी क्लबचे सुहास सातोस्कर, रक्तदाता संघटना अध्यक्ष देव्या सूर्याजी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान डॉक्टर नवांगुळ यांनी नगरपालिका परिसरात व्याख्यान देत परिसर स्वच्छ करूया सुंदर भारत घडवूया असा संदेश उपस्थितांना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here