सावंतवाडी येथील तलावाच्या काठाला संरक्षक रेलिंग करण्यात यावी….

0
70

केंद्रीय मानवाअधिकार संघटन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अजित सुभेदार यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन..

सावंतवाडी,दि .०५: येथील शहरात असलेल्या मोती तलावाच्या काठाला संरक्षक रेलिंग करण्यात यावी जेणेकरून येथे बसणारे वयस्कर व्यक्ती, लहान मुले तसेच महिला वर्ग यांचा तोल जाऊन पाण्यात पडणार नाही. यापूर्वी रेलिंग नसल्यामुळे कित्येकदा तलावा काठावर बसले असता तोल जाऊन पाण्यात पडण्याच्या घटना घडल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन त्वरित कठड्यावर संरक्षक रेलिंग करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन केंद्रीय मानवाधिकारी संघटन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अजित सुभेदार यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.

तसेच जगन्नाथराव भोसले उद्यान येथे असलेल्या नाल्यातून येणारे सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणात वावर करत असतात पावसात झाडे आणि गवत वाढल्याने संध्याकाळच्या वेळेस उद्यानात लाईट कमी असल्याने नागरिकांच्या निदर्शनास येत नाहीत.
दरम्यान कोणताही अपघात होऊ नये यासाठी तेथे चांगल्या प्रकारचची लाईट बसवावी अशी या निवेदनातून पालिकेकडे मागणी करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here