गटारे साफ नसल्याने बाजारपेठेत तुंबले पाणी..

0
165

नगरपालिकेचा दुर्लक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा आरोप

सावंतवाडी,दि.१८: शहरात आज दुपार पासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे बाजारपेठेत पाणी तुंबले आहे या तुंबलेल्या पाण्याला नगरपालिका प्रशासन जबाबदार आहे पावसाळापूर्वी वारंवार नगरपालिकेला गटारे साफ करा अशी निवेदने देऊन देखील त्यांनी दखल न घेतल्याने आज बाजारपेठेत ही परिस्थिती उद्भवली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केला

तसेच येत्या दोन दिवसात सर्व नाले गटारे साफ करा अन्यथा मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल असा इशारा देखील दळवी यांनी यावेळी दिला.
दरम्यान शासनातर्फे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला असताना देखील नगरपालिका मात्र शुशागात असून कोणतेही उपायोजना करत नाहीत. त्यामुळे बाजारपेठेत ही परिस्थिती उद्भवली आहे विठ्ठल मंदिर येथील गटारासमोरील मोठा भगदाड पडला असून पावसाचे पाणी त्या खड्ड्यात जात असल्याने तो खड्डा दिसता दिसत नाही त्यामुळे शाळेतील विद्यार्थी त्यात पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तो देखील तात्काळ बुजवण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here