संबंधित ठेकेदारावर कारवाई करा.. रवींद्र मडगावकर यांचे बांधकाम विभागाला निवेदन
सावंतवाडी,दि.०४: येथील वेंगुर्ला बेळगाव महामार्ग नूतनीकरणाचे काम “मे” महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अत्यंत निष्कृष्ट पद्धतीने करण्यात आल्याने पहिल्याच पावसात रस्ता बऱ्याच ठिकाणी खचला असून वाहून गेला आहे. त्यामुळे शासनाचा निधी वाया गेला असून याला सर्वस्वी जबाबदार ठेकेदार आणि संबंधित खात्यातील अधिकारी असल्याचा आरोप भाजपा आंबोली मंडळ अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांनी केला आहे.
त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला भेट देऊन संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, तारकेश सावंत आणि उपस्थित होते.