सावंतवाडी,दि.०४: येथील आजगाव येथे पत्रकार संरक्षण समिती सिंधुदुर्ग,मैत्री ग्राम संघ, आजगाव ग्रामपंचायत व साईबाबा न्यास, यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी आजगाव ग्रामपंचायत सरपंच यशश्री सौदागर व मैत्री ग्राम संघाच्या अध्यक्षा सौ. प्रिया आजगावकर, साईबाबा प्रतिष्ठानचे विविध पदाधिकारी यांच्या हस्ते सुपारीच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
दरम्यान साईबाबा प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रपती पुरस्कार विजेते माजी शिक्षक श्री विलासानंद मठकर यांच्या हस्ते पत्रकार संरक्षण समिती सिंधुदुर्ग अध्यक्ष श्री प्रसाद मडगावकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी गावचे सरपंच सौ यशश्री सौदागर, साईबाबा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, पत्रकार संरक्षण समिती जिल्हा संघटक जाफर शेख, जिल्हा सहखजिनदार मदन मुरकर, श्रीमती सिमंतिनी मयेकर, सुशील कामटेकर,मैत्री ग्राम संघ अध्यक्षा सौ. प्रिया आजगांवकर, सीआरपी सौ. छाया हरमलकर, सौ. उमा आजगावकर, साईबाबा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री.अवी शिरोडकर,आनंद सौदागर, विश्वस्त श्री. दिवाकर पांढरे, सुरेश तेली, भालचंद्र गोडकर, शरद पांढरे, प्रमोद पांढरे, गजानन पांढरे, सुनील वाडकर, सामाजिक कार्यकर्ते दिनेश मयेकर, प्रियांका देसाई, पुजारी श्री. राजीव योगी, यांच्यासह विविध बचतगटांचे अध्यक्ष व सदस्य यांच्यासह मोठ्या संख्येने साईभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.