सिंधुदुर्ग,दि.०४: भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या कोकण विभागाचे सीईओ व सतर्क पोलीस टाईम्स साप्ताहिकाचे सल्लागार संपादक व अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख राजन बापू रेडकर ( वय-५८) यांचे काल दिनांक ०३ जुलै २०२३ रोजी मुंबई दहिसर येथील राहत्या घरात हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले.
ते मूळ वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गावातील रहिवासी होते. तसेच त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात देखील सेवा बजावली होती.भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या कोकण विभागाचे सीईओ व सतर्क पोलीस टाईम्स साप्ताहिकाचे सल्लागार संपादक असताना त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम व जिल्ह्यात मल्टी स्पेशलिस्ट होण्यासाठी, आरोग्य विभागातील विवीध समस्यांबाबत, गडकोटांच्या रक्षणासाठी अशी लोक उपयोगी अनेक उपोषणे श्री.रेडकर यांच्या माध्यमातून करण्यात आली होती.
त्यांचा स्वाभाव अतिशय प्रेमळ व मनमिळावू होता. त्यांच्या अश्या अकाली निधनाने मोठी पोकळीक निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.