दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागाला पर्यावरण प्रेमी पुरस्काराने करण्यात आले सन्मानित..

0
98

सिंधुदुर्ग,दि.०४: नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग विभाग या संस्थेच्या वतीने वृक्षसंवर्धन, दुर्गसंवर्धन व सामाजिक क्षेत्रामध्ये देत असलेल्या योगदानाबद्दल दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग चा ‘पर्यावरण प्रेमी’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
रविवार दिनांक २ जुलै २०२३ रोजी कुडाळ येथील मराठा हॉल मध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १० संस्था आणि ५ व्यक्तींना सन्मानचिन्ह आणि तुळशीचं रोप देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सर्व पदाधिकारी, विविध क्षेत्रातील सन्माननीय व्यक्ती उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here