जिल्हा खनिकर्म अधिकारी यांचा कार्याललिन फोन गेले सहा महिने नादुरुस्त…

0
86

जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनाचा सुळसुळाट मनसे माजी सावंतवाडी तालुकाअध्यक्ष गुरुदास गवंडे यांचा आरोप

सावंतवाडी, दि.१९: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध गौण खनिज, क्रशर हे जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या आशीर्वादाने चालू आहेत. सावंतवाडी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन होत आहे. तसेच दोडामार्ग तालुक्यामध्ये ही मायनिंग विनापरवाना चालू आहे. हे सर्व जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या आशीर्वादाने चालूच आहे. सर्वसामान्य जनतेला त्रास देण्याचे काम महसुल यंत्रणा मोठ्या प्रमाणात करीत आहे. आज गौण खनिज वरून विदाऊट पासेस शासनाची रॉयल्टी न भरता वाहतूक होते. निगुडे गावातून सकाळी चार वाजले पासून अवैध वाहतूक होते. यासंदर्भात सावंतवाडी तहसीलदार यांना विचारणा केली असता तुम्ही ती वाहतूक थांबवा असे सांगितले जाते याला सर्वस्वी जिल्हा खनिकर्म अधिकारी आणि महसूल यंत्रणा जबाबदार असून जर सोमवार पर्यंत जिल्हा खनिकर्मअधिकारी यांचा कार्यालयीन फोन चालू न झाल्यास जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही मनसेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी दिला आहे. जर जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना गौण खनिज पास देण्याचे अधिकार आहेत तर त्यांनी स्टॅम्प मारण्याचे काम करावे. जिल्ह्यात अवैद्य उत्खन्यांवर कारवाई करायला जमा नसेल तर त्यांनी या जिल्ह्यात थांबू नये.यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करणार आहोत. की मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडवण्याचं काम या जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. अजित पाटील करत आहेत. त्यांचे कर्मचारी सांगतात की त्यांचा भ्रमणध्वनी आहे तो त्यांचा खाजगी आहे. जिल्ह्यातील खाण मालकांचे फोन उचलायला त्यांना वेळ आहे. त्यामुळे या जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री यांनी याची दखल घेऊन यांना ३१ मे पर्यंत अशा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करावी सर्व सामान्य जनतेला न्याय द्यावा. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातून जनतेसाठी असलेले फोन जर गुगल वर ठेवतात मग ते बंद का असा सवालही त्यांनी यावेळी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here