ब्राह्मणी कुलदेवता सभामंडप तळेखोल येथे आयोजित रक्तगट तपासणी शिबिरात ६८ जणांनी घेतला लाभ

0
84

दोडामार्ग,दि.१९: सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा दोडामार्ग च्या वतीने रक्तगट तपासणी शिबिरात ६८ जणांनी घेतला लाभ – स्त्रियांची संख्या लक्षणीय . उपाध्यक्षा सौ. गीतांजली संतोष सातार्डेकर यांनी उपस्थित लाभार्थींना हिमोग्लोबीन संदर्भात केले मार्गदर्शन यात हिमोग्लोबीन कमी झाल्याची लक्षणे ‘ हिमो ग्लोबीनचे महत्त्व ‘ अभावमुळे होणारे दुष्परिणाम व हिमोग्लोबीन चेप्रमाण वाढविण्याचे घरगुती उपाययोजना याविषयी सखोल मार्गदर्शन तसेच प्रतिष्ठानच्या कार्याविषयी माहिती दिली . याप्रसंगी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री जयवंत तुळसकर , सौ . सातार्डेकर मॅडम ‘ सचिव सातार्डेकर सर सहसचिव वैभव रेडकर तसेच हे शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेणारे रामकृष्ण दळवी
यावेळी ग्रा. पं. तळेखोल सरपंच वंदना सावंत ‘ उपसरपंच महादेव नाईक ‘ सर्व सदस्य ‘ ग्रामसेवक श्री . ए . एन . दळवी ‘ एम आर सागर सावंत व रक्तगट तपासणी टेक्निशिअन श्री . कृष्णा नाईक हे उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here