१६ आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे..
मुंबई,दि.११: गेले कित्येक महिने सर्वांचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर आज सुप्रीम कोर्टानं अंतिम निकाल जाहीर केला. यामध्ये १६ आमदारांवरील अपात्रतेचा मुद्दा निकाली निघाला असून त्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
जर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आताचे सरकार धोक्यात आले असते. मात्र यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदावर कायम राहणार आहेत.
तूर्तास तरी शिंदे फडणवीस सरकारला दिलासा मिळाला आहे.