कडावल येथे दोन बंदूकासह काडतूसे जप्त..

0
105

चौघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने रंगेहाथ पकडून घेतले ताब्यात.

सिंधुदुर्ग, दि.२३: जिल्हयामध्ये अवैद्य अग्नीशस्त्रांचा वापर करुन प्राण्यांची शिकार करुन त्यांच्या अवयवांची विक्री व तस्करी करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले.ही कारवाई कडावल येथे केली आहे.त्याच्याकडून ६ लाख १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांना कुडाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर पाळत ठेवून कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक याच्याकडून देण्यात आलेल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला गुप्त माहितीच्या आधारे पांग्रड जंगलात कुडाळ येथील काही इसम कार व मोटार सायकलने जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी गेले असल्याची माहीती मिळाली होती.त्यानुसार पोलीसांनी अलर्ट होत पाठलाग केला याच वेळी कडावल बाजारपेठेत सापळा रचून अजित लाडोबा तांबे ( ५५ वर्षे, रा. वक्रतुंड कॉम्पेक्स, कुडाळ ), दत्ताराम संभाजी परब ( ५० वर्षे, रा. वक्रतुंड संकुल, लक्ष्मीवाडी, कुडाळ ), सिध्देश सुरेश गावडे ( २४ वर्षे, रा. अणसुर, टेंबवाडी, वेंगुर्ला ), नारायण प्रकाश राउळ, ( १९ वर्षे, रा. तेंडोली, खरातवाडी, कुडाळ ) या चौघांना ही ताब्यात घेण्यात आले.
हे चौघे पांग्रडवरुन कुडाळकडे एक कार ने व दुचाकी ने जात असतना वाहाने थांबवून तपासणी केली असता त्याच्याकडे दोन काडतूस बंदूका व १३ जीवंत काडतूसे आढळून आली ती हस्तगत करण्यात आली असून कार दुचाकीसह ६,१४, हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई करण्याबाबत सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक, सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे स्थानिक गुन्हा अन्वेषण चे पोलीस निरीक्षक संदिप भोसले सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, सहा. पोलीस उप निरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलीस हवालदार प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, प्रमोद काळसेकर, पोलीस अंमलदार प्रथमेश गावडे, यशवंत आरमारकर यांनी ही कारवाई करत संशयित आरोपींविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३,२५ सह कलम ३७ (१), १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here