ओंकार डान्स अॅकेडमीचे आयोजन
सावंतवाडी,दि.२३: येथील ओेंकार डान्स अॅकेडमीच्या माध्यमातून सावंतवाडीत २५ एप्रिल ते ८ मे या काळात नृत्य प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा समारोप ९ मे ला येथील पालिकेच्या उद्यानासमोर करण्यात येणार आहे. या नृत्य प्रशिक्षणात मुंबई येथील कोरिओग्राफर गणेश बालचिम तसेच सावंतवाडी येथील कोरिओग्राफर अभिषेक लाखे, आणि जान्हवी सारंग हे नृत्य प्रशिक्षणाचे धडे देणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या नृत्य शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन अॅकेडमीचे प्रमुख अनिकेत आसोलकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९४२२९०८८५३ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.