नवी दिल्ली,दि.२०: भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकत आपला भारत देश आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. युनायटेड नेशन्स पॉल्युशन फंडाच्या अहवालानुसार चीनला मागे टाकून भारत १४२.८६ कोटी लोकसंख्या सह जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. यु ए एन पी एफ नुसार चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी आहे. यातील आकडेवारीनुसार भारतातील लोकसंख्या आता चीन पेक्षा (३०) तीस लाखांनी जास्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे भारताची लोकसंख्या १४२ कोटी ८६ लाख आहे तर दुसरीकडे चीनची लोकसंख्या १४२ कोटी ५७ लाख इतकी नोंद झाली आहे.