सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी ठेकेदाराला पुन्हा काम करण्याच्या दिल्या सूचना
सावंतवाडी,दि.१९ : आंबोली चौकुळ रस्त्याचे ग्रामस्थांनी बंद पडलेले काम अखेर बुधवार पासून पुन्हा सुरू करण्यात आले.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी त्या कामाची पाहाणी केली तेव्हा हे काम निकृष्ट दर्जाच्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यानंतर ठेकेदाराला पुन्हा काम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत.
आंबोली चौकुळ या मुख्य रस्त्यातील पाच किलोमीटरच्या कामासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे
या रस्त्यातील पाचशे मीटरचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करून तेथील स्थानिक ग्रामस्थांनी काल हे काम बंद पडले होते.तसेच जो पर्यंत त्या ठिकाणी अधिकारी येवून समर्पक उत्तर देत नाहीत तोपर्यंत काम सुरू करणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली होती.
या पार्श्वभूमीवर अनामिका चव्हाण यांनी त्या कामाला भेट देत कामाची पाहणी केली त्या ठिकाणी असलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी ते काम पुनश्च करण्याच्या सूचना दिली आहे. याबाबतची अधिक माहिती घेण्यासाठी चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुजोरा दिला.
त्या म्हणाल्या हे काम करणा-या ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याच्या आरोप येथील स्थानिक ग्रामस्थांनी केला होता तसेच हे काम बंद पाडले होते आपण बाहेर असल्यामुळे त्या ठिकाणी जाऊ शकले नाही परंतु आज त्या ठिकाणी पाहणी केली व ठेकेदाराला हे काम पुन्हा करण्याच्या सुचना दिल्या आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी तुकाराम गावडे,पांडू चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.