इंडियन ऑईल अदानी वेंचर्स लिमिटेड कंपनीच्या सी. एस.आर.फंडातून गावठाण, जांभूळपाडा ,चिरनेर आदिवासीं आश्रम शाळांना संगणक संच वाटप !…

0
122

प्रतिनिधी : विठ्ठल ममताबादे

उरण दि.२० :भारतीय तेल व्यवसाय क्षेत्रात आपल्या नावाचा एक वेगळाच ठसा उमटवणारी कंपनी अर्थात इंडियन ऑईल अदानी वेंचर्स लिमिटेड या कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पोंशिबीलीटी म्हणजेच सी. एस.आर.फंडातून आणि केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईवर यांच्या प्रयत्नातून सामाजिक दायित्व जपतं उरण तालुक्यातील गावठाण , जांभूळपाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि चिरनेर आदिवासीं आश्रम शाळा या तीन शाळांना प्रत्येकी दोन असे ६ ( सहा )संगणक (कंप्युटर )भेट स्वरूपात देण्यात आले.

परमानंद पाटील यांच्या माध्यमातून केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांनी तसेच इंडियन ऑईल अदानी वेंचर्स लिमिटेड या कंपनी व्यवस्थापन कमिटीचे एच.आर.पी.आर.हेड मिलिंद मोघे,संदीप काळे आणि त्यांची टीम यांच्या कार्य तत्परतेतून आणि या कंपनीच्या सहकार्याने तीन शाळांना मोफत सहा संगणक संच देण्यात आले. ज्यांचा उपयोग त्या शाळांतील गरीब – गरजूवंत आदिवासीं विद्यार्थी वर्गाच्या शालेय जीवनातील उज्वल भविष्याकरिता होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here