डिएड धारकांसाठी आंदोलन करावे लागले ही शोकांतिका.. विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार
सावंतवाडी,दि.२०: ठाकरे युवासेनाला डिएड धारकांसाठी आंदोलन करावे लागले ही शोकांतिका असून अडीच वर्ष महाविकास आघाडी म्हणून सत्तेत असतांना व शिवसेनेचा मुख्यमंत्री असतांना बेरोजगार डि एड धारकांचा प्रश्न कळकळीने का सोडविला नाही असा प्रश्न मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार व तालुका उपाध्यक्ष अतुल केसरकर यांनी युवासेनेच्या आजच्या आंदोलनावर केला.
श्री सुभेदार यांनी यासंदर्भात पत्रकार प्रसिद्धीस दिले असून त्यात असे म्हटले की, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानासमोर ठाकरे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले मात्र स्वतचे सरकार अडीच वर्षे सत्तेत असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना डीएड भरतीचा प्रश्न कळकळीने का सोडवला नाही, आत्ता त्यांना डि एड धारकांचा एवढा पुळका का आला. केवळ दिखाव्यासाठी हे आंदोलन असून डीएड धारकाच्या मनसे सदैव पाठीशी आहे लवकरच यासाठी विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांची भेट घेऊन डीएड पदवीधरांचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.
ते पुढे म्हणाले, मंत्री केसरकर हे ठाकरे सेनेला लाथ मारून शिंदे सेनेमध्ये गेल्याने गटातटाच्या राजकारणातुन आजचे हे आंदोलन होते त्यामागे डीएड धारकांचा प्रश्न सोडवण्याचा कुठलाही हेतू नव्हता मंत्री केसरकर हे सुद्धा युती सरकारच्या काळात पालकमंत्री होते केसरकर हे शिवसेनेत असताना हा प्रश्न सोडवण्यासाठी युवा सेनेकडून कितीदा आंदोलने आवाज उठवण्यात आला. त्यामुळे आंदोलन हे एक प्रकारे शोकांतिकाच म्हणावी लागेल असे मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार व माजी तालुका उपाध्यक्ष केसरकर म्हणाले.