सावंतवाडी,दि.१५: तालुक्यातील आंबोली येथील प्रमुख गावकर तथा कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे कानाजी गावडे यांचा आज खासदार विनायक राऊत यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
आंबोली येथील शिवसैनिक संतोष पाताडे, विभाग प्रमुख बबन गावडे, शाखाप्रमुख नारायण कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य काशीराम राऊत हे खासदार विनायक राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ओरस येथे गेले असता हा सत्कार करण्यात आला.