ओवळीये माजी सरपंच विनायक सावंत यांनी केला होता पाठपुरावा
सावंतवाडी,दि.१५ : तालुक्यातील दाणोली ते ओवळीये रस्ता वाहतुकीस अगदी खराब झाला होता, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ओवळीये माजी सरपंच विनायक सावंत यांनी शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे रस्ता दुरुस्तीसाठी निधी मेळावा यासाठी वारंवार पत्राद्वारे मागणी केली होती. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये या कामाला मंजुरी मिळाली आहे.
दाणोली ते ओवळीये ग्रामीण मार्ग १८ चे काम मंजुर केल्याबद्धालं युती सरकारचे व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा दीपक भाई केसरकर,पालकमंत्री मा. रवींद्र चव्हाण तसेच राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे ओवळीये माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विनायक सावंत यांनी जाहीर आभार मानले आहेत.