प्रशासनाने शहरात घेतलेला करवाढीचा निर्णय मागे घ्यावा.. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
सावंतवाडी,दि.०१: येथील माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सावंतवाडी पालिका प्रशासनाने शहरात घेतलेला करवाढीचा निर्णय मागे घेण्यात यावा. या मागणीसाठी आज प्रांताधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. यावेळी कर वाढ मागे घ्या, कर वाढ रद्द झालीच पाहीजे, अशा आशयाच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव, उमाकांत वारंग, सुरेश भोगटे,अफरोझ राजगुरू, अन्नपुर्णा कोरगावकर, रवी जाधव, समिरा शेख, संतोष तळवणेकर, जिकर मेमन, शेखर सुभेदार आदी मान्यवर या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.