उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा मुख्याधिकारी यांना इशारा…
सावंतवाडी,दि.०१: येथील पालिकेकडून वाढविण्यात आलेली घरपट्टी आणि पाणीपट्टी यासंदर्भात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ आणि त्यांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेतली.
यावेळी बोलताना जोपर्यंत निवडणुका लागत नाहीत आणि पालिकेत नव्याने नगराध्यक्ष व नगरसेवक येईपर्यंत सावंतवाडी शहरात कोणतीही वाढीव कर आकारणी करण्यात येऊ नये. जनसुनावणी घेवून पुढील भूमिका घ्यावी, तो पर्यंत पालिका प्रशासनाने घेतलेला निर्णय तूर्तास थांबवावा, अन्यथा आम्हाला जनसामान्यांसाठी जन आंदोलन उभारावे लागेल. असा इशारा आज येथे ठाकरे गटाच्या माध्यमातून मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना देण्यात आला.
दरम्यान मुख्याधिकारी यांनी आपण कर वाढ केली नाही.असे म्हणणार नाही. परंतु वाढता भांडवली खर्च लक्षात घेता नियोजन करण्यासाठी अतिशय माफक प्रमाणात आपण कर वाढ केली आहे. असे जावडेकर यांनी मान्य केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, बाळा गावडे, जयेंद्र परुळेकर, शब्बीर मणियार, श्रुतिका दळवी आदी उपस्थित होते.



