या कार्यालयातील अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची जबाबदारी कोणाची.. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर संतप्त..
सावंतवाडी, दि.२१: येथील तालुका भूमी अभिलेख कार्यालय गेले अकरा दिवस अधिकाऱ्यां विना रिक्त आहे या कार्यालयातील अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची जबाबदारी कोणाची अशी संतप्त प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी कोकण दर्शन डिजिटल मीडियाशी बोलताना दिली.
…. तसं पाहिलं तर सावंतवाडी भूमी अभिलेख कार्यालयाचे नाव बदलून खाऊ गल्ली ठेवाव लागेल वजनाशिवाय या कार्यालयात काम कोणाचीच होत नाहीत अशी या कार्यालयाची ओळख आहे,
परंतु त्याच्यावरती कहर म्हणून गेले ११ दिवस या कार्यालय कर्मचाऱ्या विना सुरू असून सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी कष्टकरी जमीनदार नागरिकांना या कार्यालयात अकरा दिवस येऱ्या-जाऱ्या घालाव्या लागत आहेत.
यामुळे तालुक्यातील नागरिकांना याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
असा आरोप माजी नगराध्यक्ष साळगावकर यांनी केला आहे.
लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी सामान्य नागरिकांचा हा प्रश्न मार्गी लावावा आणि या बे-जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.